नवी दिल्ली : दिल्लीत भाजप तर कर्नाटकमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. आठ राज्यांमधील विधानसभेच्या १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूक मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठ राज्यातल्या १० विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपची सरशी झाल्याचं चित्र आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या राजौरी गार्डन विधानसभा मतदार संघात आप उमेदवाराचा दारूण पराभव होण्याच्या मार्गावर आहे. चौथ्या राऊंडच्या मतमोजणीनंतर भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे 50 टक्के मतं मिळाली आहेत. तर आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला अवघी दहा टक्के मतं मिळाली आहेत. 


दरम्यान, कर्नाटकातल्या दोन जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर असून पश्चिम बंगालच्या पोटनिवडणुकीत तृणमूलच्या उमेदवाराला विजय मिळण्याची शक्यता आहे. 


- हिमाचल प्रदेश : भोरंज मतदारसंघातून भाजप उमेदवार अनिल धिमान विजयी
- कर्नाटकमधील दोन्ही जागांवर काँग्रेस आघाडीवर
- दिल्ली :  राजौरी गार्डन मतदारसंघात भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा आघाडीवर
- मध्यप्रदेश :  बांधवगड आणि अटेरमधून भाजप आघाडीवर
- कर्नाटक :  नंजनगुंड आणि गुंदलूपेटमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर
- राजस्थान :  ढोलपूर मतदारसंघात भाजप उमेदवार आघाडीवर
- दिल्ली :  राजौरी गार्डनमध्ये भाजप उमेदवार आघाडीवर
- हिमाचलप्रदेश : भोरंजमधील पोटनिवडणुकीतील सुरुवातीचे कल हाती, भाजप उमेदवार आघाडीवर